योग"दान"

शिवरायांच्या जन्मावेळी समर्थ सुमारे २२ वर्षांचे होते...तपश्चर्या संपवून भारत भ्रमणाला निघाले होते...
शिवराय १४ वर्षांचे झाले तेंव्हा ३६ वर्षांचे समर्थ महाराष्ट्रात परतले...हिंदुस्थानाची भीषण अवस्था पाहून त्यांनी काही एक कार्य मनोमन निश्चित केले...याच काळात शिवराय देखील झटून कामाला लागले...

एकाने समाजकारण केले...एकाने राजकारण केले...समर्थांचे समवयस्क तुकोबारायही याच काळात समाजाला भक्तीमार्गाचा अति तळमळीचा उपदेश करीत होते...परंतु तुकोबारायांनी वयाच्या ४२ व्या वर्षीच अवतार समाप्ती केली...(शिवरायांचे वय सुमारे १८ वर्षे)

पुढची ४० वर्षे समर्थ व शिवराय दोघेही याच महाराष्ट्रात राहून राष्ट्रकार्य करीत राहिले...शिवरायांच्या अवतार समाप्तीनंतर (१६८१) समर्थांनी देह ठेवला (१६८२) त्यामुळे समर्थांना शिवरायांच्या जन्मापासूनची संपूर्ण कारकीर्द अनुभवता आली! याही देही याची डोळा बघता आली!

याच दिव्य कारकिर्दीचा आढावा या ग्रंथात तटस्थपणॆ घेतला जाणार आहे...


सध्या काही परकीय शक्ती साम,दाम,दंड व भेद नीती वापरून शिवसमर्थांच्या या महान कार्याला धक्का पोहोचवू पहात आहेत...अशा प्रसंगी ख-या राष्ट्रभक्ताने शांत न रहाता त्याचा समर्पक प्रतिवाद करणे हे कधीही समाज हिताचे आहे...याच संकल्पाने हा एक कोटी रुपयांच्या पुढे जाणारा प्रकल्प संस्थान ने हाती घेतलेला आहे.

यासाठी समर्थ भक्तांची समर्थ साथ हवी आहे...तरी आपण वा आपल्या परिचयातले धनिक समर्थभक्त या कार्यास जर काही हातभार लाऊ शकणार असतील तर ते हवेच आहे...आज दुर्जन सक्रीय दिसतात याचे कारण सज्जनांचे दौर्बल्य नसून सज्जनांची निष्क्रीयता हे त्याचे कारण आहे. हा कलंक धुवून टाकून समर्थांच्या आशीर्वादास पात्र होण्याचा हा एक अभिनव मार्गच आहे...

संपर्क : रोहीतबुवा रामदासी   ७८७५६३१५०५

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥